post

मल्चिंग पेपर - एक पाऊल प्रगत शेतीकडे

कमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतकरी बांधवांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागतो. मल्चिंग पेपरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास खऱ्या अर्थाने शेतकरी एक पाऊल प्रगतीकडे वाटचाल करतील.

शेतकऱ्याने जीवन साधन मिळवण्यासाठी किंवा एक धंदा म्हणून शेतावर चालवलेला व्यवसाय अशी शेतीची ढोबळमानाने व्याख्या करता येईल. भारतातील शेती हा खूप महत्वाचा व्यवसाय आहे.

पिके आणि शेतीचा प्रकार हे जमीन आणि भूरचना यांवर अवलंबून असतात पण याला जर पर्जन्यमानाची जोड मिळाली  तर त्यांचे परिणाम अधिक  दिसतात. मल्चिंग पेपरच्या साहाय्याने शेती हा शेतकरी बांधवांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मल्चिंग पेपरच्या वापरामुळे तणांची वाढ नाही. तणांची वाढ रोखण्यासाठी होणाऱ्या खर्चात कपात होते. दर्जेदार उत्पादन मिळते. यामुळे उत्पादनाला चांगला भाव मिळतो. निश्चितच याचा फायदा शेतकरी बांधवांना होतो. मल्चिंगच्या मदतीने भाजीपाल्यासह अनेक पिकांची शेती करणे शक्य आहे. यामध्ये भाजीपाला पिकांपासून ते फूल पिकांपर्यंत सगळी पिके मल्चिंग पेपरच्या मदतीने घेता येतात.

 

आपल्या गरजेनुसार मल्चिंग फिल्म ची निवड कशी करावी?

 

 

काळी प्लास्टिक फिल्म

काळी प्लास्टिक फिल्म जमिनीचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते तसेच पिकांमध्ये तनवाढीला नियंत्रित करते. बागायती शेतांमध्ये या फिल्म चा वापर केला जातो.

अपारदर्शक फिल्म/ सिल्वर फिल्म

अपारदर्शक फिल्म जमिनीचे तापमान नियंत्रित करण्यास चांगला करते तसेच पिकांमध्ये तनवाढीला नियंत्रित करते.

पारदर्शक फिल्म

हि फिल्म जमिनेचे सोलरायझेशन करण्यास मदत करते. थंडीच्या मौसमात शेती करताना या फिल्म चा वापर होतो.

मल्चिंग फिल्म खरेदी कशी करावी ?

बाजारामध्ये खूप कंपन्याचे चांगला मल्चिंग पेपर मिळतात पण फिल्म खरेदी करताना स्वस्तात फिल्म देणाऱ्या कंपन्यांना बळी पडू नका. अपारदर्शक किंवा काळी फिल्म खरेदी करताना तिला सूर्यप्रकाशाच्या दिशेने धरावे जर तिच्यातून सूर्यप्रकाश आरपार झाला तर अशी फिल्म खरेदी करू नये. सध्या बाजारामध्ये लाल, निळ्या अशा विविधरंगी फिल्म मिळतात पण या फिल्म खरेदी करण्याचा मोह टाळावा. शक्यतो याऐवजी काळी किंवा सिल्वर फिल्म खरेदी करावी.

मल्चिंग फिल्म चा वापर करताना खालील प्रकारे काळजी घ्यावी

प्लास्टिक फिल्म हि सकाळी किंवा सायंकाळी अंथरावी आणि अंथरताना ती जास्त ताणू नये किंवा सैल देखील सोडू नये. फिल्म मध्ये रोपासाठी छेद करताना सिंचन नलिकेची जागा लक्षात घ्यावी. छेद करताना ते एकसमान आकाराचे असावेत आणि छेद करताना फिल्म फाटणार नाही याची काळजी घ्यावी. मल्चिंग फिल्म चा पुनर्वापर होतो म्हणून तिला फाटण्यापासून वाचवावे आणि गुंडाळताना रोल मध्ये गुंडाळून सुरक्षित ठेवावी.

मल्चिंग पेपरचे फायदे :-

 

 

बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी पूर्णतः थांबवते. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि बाष्पीभवन थांबल्याने क्षार वरच्या भागावर येण्याचे प्रमाण कमी होते, कमी पाण्याच्या वापरामुळे खतांचे प्रमाण देखील कमी होते. मल्चिंग फिल्म मुळे जमिनीत हानीकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो आणि तणाच्या वाढीस प्रतिकार होतो कारण सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही. प्लास्टिकच्या प्रकाश परिवर्तनामुळे काही किडी रोग दूर जातात. मल्चिंग फिल्म जमिनीचे तापमान वाढते त्यामुळे जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते. आच्छादन पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते, ज्यात कार्बोन डायऑक्साइडचे प्रमाण अधिक असते. मल्चिंग फिल्म मुळे पिकाची उगवण २-३ दिवस लवकर होते. भुईमुगासारख्या पिकाकरीत मल्चिंग फिल्म वापरल्यास मुळांवरील गाठीचे प्रमाण वाढते आणि सूत्रकृमींचे प्रमाण कमी होते.मल्चिंग फिल्ममुळे पावसाच्या पाण्याने होणारी जमिनीची धूप थांबते. इतर छटांच्या प्लास्टिक च्या तुलनेत काळे प्लास्टिक बरेच महत्वाचे फायदे देतात. तण नियंत्रणासाठी काळे प्लास्टिक एक उत्कृष्ठ मटेरियल आहे. गडद रंग सूर्यप्रकाशास बाहेर काढतो ज्यामुळे किरण तणलेल्या रोपांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. हे त्यांना पुढील वर्षासाठी तण उपटणी प्रक्रियेस आणखी मदत करेल. ज्यांना आपले बागकाम हंगाम वाढवायचे आहेत त्यांना हे जाणून घेण्यास आनंद होईल कि मातीचे तापमान वाढवण्यासाठी काळी प्लास्टिक अत्यंत प्रभावी आहे. हे दवापासून उत्कृष्ठ रक्षणकर्ता बनू शकते.

 

आपली जमीन आपली शेती.

Read 9608 Times
Published In Packaging Industry

Leave a comment

0 Comments

Make sure you enter the (*) required information where indicated. HTML code is not allowed.